पाणचक्की

औरंगाबाद शहरातील पाणचक्की हे एक आकर्षक प्रेक्षणीय स्थळ आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ हे स्थळ आहे. येथे पर्यटक सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जाऊ शकतात. येथे जाण्यासाठी प्रवेश शुल्क असून भारतीय पर्यटकांसाठी विदेशी पर्यटकांच्या तुलनेत कमी शुल्क आहे.

पाणचक्की हे देशी-विदेशी पर्यटकांसाठी खास आकर्षण केंद्र आहे. देशाबरोबरच जगातील अनेक पर्यटक येथे भेट देतात. या पाणचक्कीची रचना थक्क करणारी आहे. येथे वर्षभर पाण्याचा प्रवाह असल्याने मोठे लोखंडी पाते व दगडी जाते यांना गती मिळते.

येथे असणाऱ्या दर्गा संकुलातील अनेक इमारती तुर्कताज खान याने सन १६९५ मध्ये बांधल्या होत्या. येथे आयताकृती जलाशय आणि कारंजे असून ते लक्षवेधी आहेत. पाणचक्की पिठाच्या गिरणीचे मोठमोठे दळणारे दगड फिरवण्यासाठी तयार करण्यात आली होती.

यात्रेकरू, संतांचे शिष्य तसेच चौकीच्या सैन्यासाठी धान्य दळण्याकरिता या पाणचक्कीचा वापर केला जात असे.औरंगाबादमधील पाणचक्की हे तत्कालीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडविणारी आहे. ही ‘वॉटर मिल’ म्हणूनही ओळखली जाते. जवळच्या डोंगरावरील झऱ्याचे पाणी खाली आणून उर्जेची गरज भागवण्यासाठी ही बांधली गेली होती. या पाणचक्कीच्या सभोवताली बाबा शाह मुसाफिर दर्गा, विस्तीर्ण बाग आणि इतर अनेक स्मारके आहेत. आवर्जून भेट द्यावी, अशी ही पाणचकी आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *