मराठी वेबमालिका ‘सिंपल आहे ना ?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच समाजमाध्यमांवर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे चाहत्यांनाही तो भारी आवडलेला दिसत आहे. मुंबईतील मध्यरात्रीच्या लक्षवेधी घटना यात दाखविल्या आहेत.
यात सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे हे कलाकार दिसतील. जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार कोल्हे, डॉ. प्रेरणा कोल्हे निर्मित या वेबमालिकेचे दिग्दर्शन जान्हवी कोल्हे हिने केले आहे. लेखन सिद्धार्थ आखाडे यांनी केले आहे. ही वेबमालिका येत्या १ मे रोजी ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहता येणारी आहे.
ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन चुकल्याचे दाखविण्यात आले आहे. ओळख नसणारा एक रिक्षाचालक त्यांची मदत करताना दिसत आहे. यात धमाल, मैत्री, प्रेम हे सगळेच पहायला मिळणार आहे.