बेताळभाटी किनारा 

बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे.  पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे.  येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला दाखवू शकतात. या किनाऱ्यावर अनेक  नारळाची झाडे आहेत.

आपण येथे डॉल्फिन स्पॉटिंग पाहू शकता. येथून मच्छिमारांचे निरीक्षण करु शकतात. तुमच्या छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. समुद्रकिनाऱ्यावरील शॅकवर अस्सल गोव्याच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात.  नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा बेतालभाटी किनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. हे हवामान आनंददायी आणि उत्तम वेळ घालविण्यासाठी योग्य आहे.

बेतालभाटी किनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्ही गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथून टॅक्सी भाड्याने घेऊ शकता.  ज्यासाठी तुम्हाला ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट कॅब भाड्याने घेऊन देखील पोहोचू शकता, ज्यासाठी तुम्हाला सुमारे 35 मिनिटे लागतील.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *