खरोसा लेणी

लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी हे नाव पर्यटकांच्या यादीत असते. औसा तालुक्यातील खरोसा गावात ही लेणी आहेत. या लेण्यांच्या पायथ्याशी खरोसा गाव आहे. त्यामुळेच या लेण्यांना ‘खरोसा लेणी’ म्हणतात. लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी व धाराशिव लेण्यांपासून ८२ किमी. अंतर आहे. जांभा खडकाच्या डोंगरमाथ्‌यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण १२ लेणींचा समुह आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुकादेवीचे मंदिर आहे.

जेम्स बर्जेस या अधिकाऱ्याने ही लेणी सर्वप्रथम शोधून काढली. त्यानंतर लेण्यांकडे विद्वानांचे लक्ष वेधले. हे लेणे बदामी येथील तीन हिंदू लेण्यांसारखेच आहे. खरोसा येथील लेणी सु. इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. यादरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. विराज शाह यांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सु. ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे.

यामधील एक लेणी बौद्ध लेणी असून त्यात भगवान बुद्ध यांची बसलेल्या स्थितीतील मूर्ती आहे. ही मुर्ती नवीन असून मुर्तीला रंगकाम केले आहे.  दुसऱ्या लेणींमध्ये शिवलिंग आहे. लेण्यांमध्ये पौराणिक कलाकृती कोरलेल्या आहेत. या लेण्यांची बरीच झीज झालेली आहे. या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी पुणे विमानतळ सर्वात जवळ आहे.  रेल्वेने गेलयास लातूर रेल्वे स्थानकावर उतरावे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *