लिनोवा कंपनीचा ‘आयडिया पॅड प्रो ५ जी’ लॅपटॉप भारतात दाखल झाला आहे. हा नवा लॅपटॉप एआय फीचर्सने सुसज्ज आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर अल्ट्रा सीरीज सीपीयु असेल. या लॅपटॉपला 32 जीबी रॅम आणि 1जीबी स्टोरेज आहे. लॅपटॉपची बॅटरी 84 डब्लूएच असून फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार हा लॅपटॉप 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तासांपर्यंत चालेल. कंपनीने हा लॅपटॉप 1,09,990 रुपये इतक्या किंमतीत सादर केला असून त्याची विक्रीही सुरू झाली आहे. हा लॅपटॉप कंपनीचे संकेतस्थळ आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. हा लॅपटॉप फक्त आर्क्टिक ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.
लॅपटॉपचा रिफ्रेश रेट 120 हर्टझ इतका आहे. शिवाय त्याचे रिझोल्यूशन 2.8 के आहे. हा लॅपटॉप विंडोज 11 प्रो वर काम करतो.