जुनं फर्निचर

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

वृद्ध आई-वडिलांना मुले नाकारतात, शरीर थकते, पैसे नसल्यामुळे हाल होतात, या सगळ्या गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
वेगळ्या धाटणीच्या आशयपूर्ण मांडलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली असून पहिल्या दिवशी ४० लाख रुपये व दुसऱ्या दिवशी ७७ लाख रुपये कमावले आहेत. आतापर्यंत चित्रपटाने २.९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *