आज्जीबाई जोरात

‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत यांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ ही नाटके विशेष गाजली होती.

त्यांना आता नवीन बालप्रेक्षक तयार करायचा आहे. ती इच्छा ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाच्या निमित्ताने पूर्ण होणार असल्याने त्या खूश आहेत. निर्मिती इतर माध्यमांमध्ये अभिनय करीत असल्या तरी त्यांची नाटकाशी नाळ जुळलेली आहे. इतर ठिकाणी कितीही कामे केली तरी नाटकात काम करणे सुरू राहील, असे त्यां सांगतात.  या नाटकात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे असे कलाकार आहेत. या नाटकात नाच, गाणी, धमाल असून  कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच  तगडे कलाकार असल्याने हे नाटक जोरात चालणार आहे, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *