पंचायत ३ लवकरच

ओटीटी मंचावरील बहुचर्चित वेबमालिकेमध्ये समाविष्ट असलेली ‘पंचायत 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी ‘पंचायत 3’ च्या चित्रीकरणाची सुरुवात जाहीर केली होती. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारे या मालिकेची निर्मिती केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे, चंदन कुमार यांनी ‘पंचायत ३’ ची कथा लिहिली आहे.

दोन सुपरहिट भागांनंतर आता तिसरा भागही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील सर्व पात्रे त्यांच्या विनोदाची छाप सोडतात. समाजमाध्यमांवर मालिकेतील संवादांवर अनेक मीम्सही बनवले जातात. प्राइम व्हिडीओने तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा भाग 28 मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सानविका यांच्या यात भूमिका आहेत.

मागील दोन हंगामात ‘फुलेरा’ गावातील रहिवासी वेगवेगळ्या आव्हानांशी झुंजताना दिसले. आता नव्या भागत ही मालिका नवे वळण घेणार आहे, म्हणजेच फुलेरा गावात पुन्हा गोंधळ उडणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *