‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट महाराष्ट्र दिनी १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गायक, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात ‘बाबूजीं’ची भूमिका सुनील बर्वे यांनी साकारली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले आहे.
‘बाबूजीं’च्या पत्नी ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे व ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर साकारत आहेत. हा चित्रपट सौरभ गाडगीळ यांची प्रस्तुती आहे.’ चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटासोबतच ‘नाच गं घुमा’ व महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हे चित्रपटही सध्या चित्रपटगृहामध्ये गर्दी खेचताना दिसत आहेत.