नैसर्गिक फेशियल

चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढविण्यासाठी फेशियल हा एक चांगला पर्याय आहे. महिन्यातून एकदा तरी फेशियल करणे त्वचेसाठी खूप चांगले असते. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. त्वचा चमकदार दिसते. तथापि, ‘पार्लर फेशियल’ खिशाला खूप भारी पडते. तसेच रसायनांच्या वापरामुळे त्वचेवर ॲलर्जीही होऊ शकते. म्हणूनच, घरच्या घरी फेशियल करणे चांगले.

फेशियल करण्यापूर्वी, चेहरा आणि मान फेसवॉशने धुवावी. दुधाने चेहरा स्वच्छ करावा. यासाठी दुधात एक कापूस बुडवून चेहरा आणि मान नीट स्वच्छ करावी. कच्चे दूध क्लिनिंगसाठीही चांगले असते. म्हणून चेहरा स्वच्छ केल्यानंतर वाफ घेणे महत्वाचे आहे. यामुळे छिद्रे उघडतील आणि चेहरा चमकेल. स्टीमर किंवा कोणत्याही भांड्यात पाणी गरम करून चेहऱ्याला वाफ द्यावी.

चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी ‘एक्सफोलिएशन’ आवश्यक आहे. यासाठी एक चमचा लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि गुलाबजल मिसळून लेप बनवावा. त्याने चेहऱ्याला मसाज करावे. 2-5 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा ओल्या कपड्याने स्वच्छ करावा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी स्वच्छ होतील.

मध हे नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. ते हातावर थोडेसे घेऊन चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावावे. नंतर ओल्या कापडाने स्वच्छ करावा.

एका भांड्यात कडुलिंबाची पाने, केळी, काकडी आणि दही टाकून लेप तयार करावा. आता हा लेप चेहऱ्यावर 20-30 मिनिटे लावावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या फेशियलमुळे त्वचेवर चमक येईल, आणि त्वचा जलसंपृक्त दिसेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *