माजोर्डा समुद्रकिनारा

माजोर्डा समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे मऊ सोनेरी वाळू आहे. आनंदाने डोलणारी नारळाची झाडे आणि वारे या किनाऱ्याच्या प्रेमात पाडतात. येथे वॉटर स्कीइंग, डॉल्फिन स्पॉटिंग, बनाना राईड, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. माजोर्डा किनाऱ्यावर वाजवी किमतीत सेवा देणारी काही शॅक आहेत. काही लक्झरी हॉटेल्स अगदी जवळ आहेत.

जर तुम्हाला गोव्यातील पेयांचा आस्वाद घ्यायचा असेल, आणि पहाटेपर्यंत रहायचे असेल, तर तुम्ही काही लोकप्रिय पब आणि नाइटक्लबला भेट देऊ शकतात. हे उत्कृष्ट सेवांमुळे प्रसिद्ध आहेत.

माजोर्डा किनाऱ्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. गोव्याची राजधानी पणजी हे माजोर्डा किनाऱ्यापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचे ठरविल्यास टॅक्सी भाड्याने घेऊ शकतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *