गौरवने हास्यजत्रा सोडली

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अनेकांचा लाडका कलाकार गौरव मोरे याने समाजमाध्यमावर एक पोस्ट जोडली आहे. त्यात तो म्हणतो की,
”आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……

रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिले. नाव दिले, सन्मान दिलात. त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत.
मला सांगताना खूप वाईट वाटतेय की, मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो, माध्यम सारखे राहिले आणि तुमचे प्रेमदेखील ! असे म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला. यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे..”

सध्या गौरव मोरे हिंदी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचायेंगे इंडिया को हसायेंगे’ या कॉमेडी शो मध्ये दिसत आहे. मराठी प्रमाणेच गौरवने हिंदीतही प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. गौरव मोरेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून लोकप्रियता मिळाली होती. मध्यंतरी त्याने त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे या शोमधून ब्रेक घेतला होता. पण तो पुन्हा आल्यावर त्याचे चाहते खूप खुश झाले होते. आता शो सोडणार असल्याची घोषणा गौरवने केल्यावर चाहत्यांना मात्र वाईट वाटले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *