दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत जबरदस्त भूमिका साकारलेली सखी गोखले आता बॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे. फायर फायटर यांच्या शौर्यावर आधारित असलेल्या आगामी ‘अग्नी’ चित्रपटात सखी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
”या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक बड्या कलाकारांसोबत काम करता आले. सेटवर जवळची माणसे असल्यासारखे वातावरण होते. सिनेमात दिव्येंदूसह माझे सर्वाधिक काम होते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मस्त होता. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी या सगळ्यांसोबत काम करणे स्वप्न होते. या सगळ्या भावना शब्दातीत आहेत.”
‘अग्नी’मध्ये सखी गोखलेसह प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, दिव्येंदू, सैयामी खेर, जयवंत वाडकर असे अन्य कलाकार आहेत.