शेती आणि शेतकरी या विषयावर भाष्य करणारा मराठी चित्रपट ‘कासरा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, साई नागपूरे, देवेंद्र लुटे, विशाल अर्जून यांच्या भूमिका आहेत.
उत्तम कथानक आणि दर्जेदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाच्या गाण्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे.
रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी दिग्दर्शन केले आहे. रवी नागपूरे यांची कथा असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. प्रशांत नाकती, संकेत गुरव यांचे संगीत दिग्दर्शन तर प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केले आहे