फ्रीडम ॲट मिडनाईट

निखिल अडवाणी निर्मित-दिग्दर्शित वेबमालिका ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’च्या स्टारकास्टमध्ये चार ब्रिटीश कलाकार सामील झाले आहेत. जे देशाच्या स्वातंत्र्यकाळातील इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारतील. यामध्ये शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांचाही समावेश आहे. मंगळवारी नवीन कलाकारांची माहिती देण्यात आली. या मालिकेत ल्यूक मॅकगिबनी, अँड्र्यू कुलम, रिचर्ड टेव्हरसन, ॲलिस्टर फिनले आणि कॉर्डेलिया बुगेजा सामील झाले आहेत.

मॅकगिबनी हे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बुगेजा लेडी एडविना माउंटबॅटनची भूमिका साकारणार आहे. ॲलिस्टर फिनले हे माउंटबॅटनच्या आधीचे भारताचे कमांडर इन चीफ आणि गव्हर्नर आर्चीबाल्ड वेव्हेल यांची भूमिका साकारणार आहेत. सन 1945 ते 1951 दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांची भूमिका कुलमने साकारली आहे. टेव्हरसनने सिरिल रॅडक्लिफची भूमिका केली आहे, ज्याने देशाची विभागणी केली होती. डोमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकावर आधारित मालिका सोनी लाइव्ह प्रसारित केली जाईल. या पुस्तकावर आधारित कथा अभिनंदन गुप्ता, युनिक करेंग दास, गुरदीप कौर, दिव्या निधी शर्मा, रवीना साराभाई आणि इथन टेलर यांनी लिहिली आहे.

या मालिकेबद्दल निखिल अडवाणी म्हणाले की, ‘रॉकेट बॉईज’च्या निर्मितीदरम्यान आम्हाला सर्वात जास्त पश्चाताप झाला. कारण होते की, आम्ही इंग्लंड आणि अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांना समाविष्ट करू शकलो नाही. कोविड आणि लॉकडाऊनने आम्हाला हे करू दिले नाही

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *