रिअलमी जीटी ६टी स्मार्टफोन

रिअलमी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी २२ मे रोजी रिअलमी जीटी ६टी स्मार्टफोन लाँच करणार आहे. रिअलमी कंपनी हा फोन सुपर ब्राइट डिस्प्ले टॅगसह प्रदर्शित करीत आहे. नवीन फोन फ्लॅगशिप डिस्प्लेसह आणला जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचा हा फोन गेमर्ससाठी खास असणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या फोनमध्ये गेमिंग दरम्यान ‘फ्रेम ड्रॉप’ची कोणतीही समस्या येणार नाही. सूर्यप्रकाशातही हा फोन वापरता येतो.

रिअलमीचा नवीन फोन ग्राहकांसाठी खास असेल. या डिव्हाइसला बॅटरीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागणार नाही. रिअलमीच्या नवीन फोनमध्ये स्लो चार्जिंग किंवा बॅटरी संपण्याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही, दैनंदिन वापरासाठी, रिअलमी फोन फक्त 10 मिनिटांसाठी चार्ज करून वापरला जाऊ शकतो. यावेळी फोन 50 टक्के चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये 120 वॅट फास्ट चार्जिंग सुविधेसह 5500 एमएएच बॅटरी आहे, कंपनीचे म्हणणे आहे की, रिअलमीचा नवीन फोन भारतातील सर्वात मोठ्या कूलिंग सिस्टीमसह आणला जात आहे. गेमिंग किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटी दरम्यान फोन गरम होण्याची कोणतीही समस्या येणार नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *