सिस्टरहुडच्या नवीन शोची घोषणा

सध्या ‘पंचायत’ वेबमालिकेचा तिसरा हंगाम प्राइम व्हिडिओवर धुमाकूळ घालत आहे.  ‘फुलेरा’ गावात प्रधानजी, सचिवजी, उप प्रधानजी आणि सहाय्यक यांचे जीवन लोकांचे मनोरंजन करत आहे. त्याचवेळी, सोनी लिव्हवरील ‘गुल्लक’चा चौथा हंगाम मिश्र कुटुंबाच्या जीवनाची झलक दाखवत मनोरंजन करत आहे. ‘पंचायत 3’ आणि ‘गुल्लक सीझन 4’ नंतर, टीव्हीएफने ‘सिस्टरहुड’ या नवीन शोची घोषणा केली आहे. या शोच्या माध्यमातून टीव्हीएफ पुन्हा एकदा शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जगात प्रवेश करीत आहे. काय आहे बहिणींची कहाणी?
‘सिस्टरहुड’ची कथा मुलींच्या शाळेवर आधारित आहे. झोया, निकिता, ॲन आणि गार्गी या चार शाळकरी मुलींच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या मालिकेत त्यांची मैत्री दिसत असून ती एकत्र लढण्याचा प्रयत्न करत आहेत. या शोमध्ये अन्वेषा विज, नित्या माथूर, निधी भानुशाली आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.’गार्गी’ या व्यक्तिरेखेबद्दल निधी भानुशाली म्हणाली की, गार्गी या व्यक्तिरेखेचा प्रवास नव्या वातावरणात स्वत:ला शोधण्यासारखा आहे. ती तिच्या वर्गमैत्रिणींपेक्षा पूर्णपणे भिन्न पार्श्वभूमीतून आली आहे, जी शाळेमध्ये एक नवीन दृष्टीकोन आणते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *