ऑगस्ट महिन्यात जपानी मोटरसायकल कंपनी सुझुकी ‘गिक्सर एसएफ 250’ किंवा ‘ग्क्सिर 250’ बाइकवर मोठी सवलत देत आहे. यावर 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, कंपनी बाईकवर 10 वर्षांपर्यंतची एक्सटेंडेड वॉरंटी देत आहे. बाइकच्या खरेदीवर कंपनी 6,999 रुपये किंमतीचे राइडिंग जॅकेट मोफत देत आहे. सुझुकी गिक्सर एसएफ 250 ची एक्स-शोरूम किंमत 1.92 लाख रुपये आहे. गिक्सर 250 ची एक्स-शोरूम किंमत 1.81 लाख रुपये आहे.
ही बाईक फायनान्सवर खरेदी करण्यासाठी कंपनी या बाईकवर 100 टक्के पर्यंत कर्जाची सुविधा देत आहे. बाईकवर मोफत विस्तारित वॉरंटी आणि फायनान्स देखील मिळेल. या सुझुकी गिक्सर एसएफ 250 ही कंपनीची एक उत्तम बाइक आहे. या दोन्ही बाइक्समध्ये 249 सीसी सिंगल सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिन आहे. त्याचे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकमध्ये दोन्ही बाजूंना सिंगल डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएसआहे. सुझुकीची ही बाईक एलसीडी कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. बाईकमध्ये डायमंड प्रकारच्या फ्रेमचे 17 इंच टायर देण्यात आले आहेत.