अमेरिकेतील डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये मंत्रोच्चाराचे गुंजन

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक उमेदवाराच्या अधिकृत घोषणेसाठी ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’ चा तिसरा दिवस बुधवारी प्रथमच वैदिक मंत्रोच्चाराने सुरू झाला.

यावेळी धर्मगुरूंनी देशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना केली. अमेरिकेतील भारतीय पुजारी राकेश भट्ट म्हणाले की,  “आमच्यात मतभेद असू शकतात, परंतु जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा आपण एकत्र असले पाहिजे. आपण एकत्र असले पाहिजे. सर्व काही समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे.” मेरीलँडमधील श्री शिव विष्णू मंदिराचे पुजारी भट्ट हे मूळचे बेंगळुरूचे रहिवासी आहेत.  यावेळी भट्ट पुढे  म्हणाले की, “संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. सत्य हा आपला पाया असून तो शाश्वतही आहे. आपण असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. ओम शांती शांती शांती।”

डेमोक्रॅटिक पार्टीचे आर्थिक व्यवहार उपप्रमुख म्हणाले की,  राकेश भट्ट यांनी डीएनसी येथे वैदिक प्रार्थना करणे हा एक महत्त्वाचा क्षण आहे. हा डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वसमावेशकता आणि विविधतेची वचनबद्धता दर्शवितो.  हा क्षण अमेरिकेच्या समाजात आपल्या समुदायाचा वाढता प्रभाव आणि वाढती ओळख प्रतिबिंबित करतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *