केंद्र सरकारकडून पीएफ खातेधारकांसाठी आनंदवार्ता आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेधारकांच्या खात्यात वार्षिक ८.२५ टक्के व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. ही बातमी देशभरातील कोट्यवधी खातेधारकांसाठी दिलासा देणारी आहे. नोकरदार लोकांचे पीएफचे पैसेही त्यांच्या पगारातून कापले जातात. आता ईपीएफओ लवकरच त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करणार आहे.
पेन्शन मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ईपीएफओने आधीच 8.25 टक्के वार्षिक व्याजदराने दावे निकाली काढण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीनंतर, वित्त मंत्रालयाने 8.25 टक्के व्याजदर मंजूर केला होता. आपल्या खात्यात व्याज जमा झोले की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम https://www.epfindia.gov .in/site_hi/ या संकेतस्थळावर जावे. ‘आमच्या सेवा’ मधील ‘कर्मचाऱ्यांसाठी’ विभागावर क्लिक करावे. येथे ‘सदस्य पासबुक’ हा पर्याय निवडावा. युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर तुम्ही तुमचे पासबुक पाहू शकता, ज्यामध्ये व्याजाची रक्कम देखील समाविष्ट असेल.