अमेरिकेत हनुमानजींच्या भव्य मूर्तीचे अनावरण

अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये भगवान हनुमानजींची भव्य आणि विशाल मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. एका मोठ्या समारंभात या प्रतिमेचे अभिषेक करुन अनावरण करण्यात आले. हा पुतळा 90 फूट उंच असून त्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा श्री राम आणि माता सीता यांच्या पुनर्मिलनातील हनुमानजींनी पार पाडलेल्या भूमिकेच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे. परमपूज्य चिन्नजीयर स्वामीजी यांची ही प्रेरणा आहे. टेक्सास येथील अष्टलक्ष्मी मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनियनचे संकेतस्थळ म्हणते, “हा पुतळा धर्मादाय, शक्ती आणि आशा पसरवेल. हे एक अध्यात्मिक केंद्राच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जिथे हृदयाला दिलासा मिळेल, मन शांत होईल.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *