रशियाच्या अध्यक्षांसोबत चीनच्या पंतप्रधानांची चर्चा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मजबूत केल्याबद्दल प्रशंसा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनमध्ये ही बैठक झाली. यावेळी पुतिन म्हणाले की, आमचे व्यापारी संबंध यशस्वीपणे विकसित होत आहेत. दोन्ही देशांचे सरकार व्यापारी आणि आर्थिक संबंधांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

चीन-रशिया संबंध अभूतपूर्व उच्च पातळीवर आहेत. ली यांनी पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिचीनचे पंतप्रधान ली केकियांग म्हणाले की, रशिया आणि चीनने आर्थिक आणि इतर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात योजनाबनवल्या आहेतशुस्टिन यांचीही भेट घेतली. कुर्स्क भागातील हल्ल्यांदरम्यान रशिया युक्रेनला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असताना ही बैठक झाली.

युक्रेनच्या संघर्षात चीनने स्वतःला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला भेट देत आहेत. भारत व रशिया हे मैत्रीपूर्ण देश आहेत. तर युक्रेन हा रशियाचा शत्रू देश आहे. अशा परिस्थितीत मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर असताना रशियाला वाईट वाटणार, हे नक्की आहे. रशियाची चीनसोबतची वाढती जवळीक आणि मजबूत होत असलेले संबंध भारतासाठी नवी डोकेदुखी ठरू शकतात. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उलट सहा आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते, तेव्हा युक्रेनने नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरही टीका केली होती.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *