
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. हा चार दिवसांचा दौरा असून ते गुरुवारी वॉशिंग्टनला पोहोचले. अमेरिका दौऱ्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेतील संरक्षण उद्योगांची उच्चस्तरीय गोलमेज बैठक होणार आहे. आज ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. उभय देशातील संरक्षण सहकार्य बळकट करण्यावर यावेळी चर्चा अपेक्षित आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांचीदेखील राजनाथ सिंह भेट घेणार आहेत. राजनाथ सिंह या दौऱ्यात तेथील भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.