इंडोनेशियात नागरिकांची संसदेत निदर्शने

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मोठ्या प्रमाणात अशांतता दिसून आली. निवडणूक कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या निषेधार्थ संतप्त निदर्शकांनी संसदेचे कुंपण तोडून संसदेत प्रवेश केला. राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची सत्तेवरील पकड मजबूत करुन त्यांच्या टीकाकारांना रोखणे हा या बदलाचा उद्देश असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. ‘जोकोवी लोकशाहीचा नाश करीत आहेत’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

काही ठिकाणी आंदोलकांनी ‘इथे लोकशाही मरत आहे’, असे लिहिले होते. राष्ट्राध्यक्ष जोकोवी यांच्या मुलाचा राजकीय पदावर जाण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या बदलांच्या विरोधात हा निषेध दर्शविण्यात आला. दरम्यान, या बदलांवर संसदेत मतदान होणार होते, मात्र पुरेसे खासदार नसल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. इंडोनेशियातील लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत देशभरात निदर्शने होत आहेत. जकार्ता व्यतिरिक्त पडांग, बांडुंग आणि योग्याकार्टा सारख्या इतर शहरांमध्येही पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्याचे समजते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *