मोदींची पॅलेस्टिनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये पॅलेस्टिनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. मोदींनी गाझामधील मानवतावादी परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करुन पॅलेस्टिनी लोकांप्रती भारताचा सतत पाठिंबा असल्याचे सांगितले. न्यूयॉर्कमधील ‘लोटे न्यूयॉर्क पॅलेस’ हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांची ही भेट झाली.
पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि कुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबाह खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. कुवेतच्या राजपुत्रासह पंतप्रधान मोदी यांनी भारत-कुवेत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.  इस्राइल-पॅलेस्टाईन संघर्षावर भारत दीर्घकाळापासून तोडगा काढण्याचा विचार करीत आहे.  इस्रायलवर हमासने केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेत्यांपैकी एक होते.  भारताने गाझामधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे.भारताने गाझातील लोकांना मानवतावादी मदत पाठवली. भारताने सन 2024-25 या वर्षासाठी भारतातील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीला 2.5 दशलक्ष डॉलर्सचा पहिला हप्ता जारी केला.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *