पाकिस्तानात हिंदू संघटनेने मागितली सुरक्षा

पाकिस्तानातील एका हिंदू हक्क संघटनेने मंगळवारी सरकारकडे मुलतानमधील एका प्राचीन मंदिरात होळी साजरी करण्यासाठी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. पंजाब प्रांतातील मुलतान शहरात असलेल्या प्राचीन प्रल्हादपुरी मंदिरात होळी आणि हिंदूंच्या इतर सणांच्या शांततेत साजरा करण्यासाठी सुरक्षा आणि आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्याची विनंती संघटनेने पाकिस्तान सरकारला केली. प्रल्हादपुरी मंदिर हे हिंदू देवता नरसिंह यांना समर्पित एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे.

लोककथेनुसार, होळीचा उत्सव याच मंदिरापासून सुरू झाला. तथापि, सध्या हे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे. ऑल पाकिस्तान हिंदू राईट्स मूव्हमेंटचे अध्यक्ष हारून सरब दियाल म्हणाले की, १४ ते १६ मार्च दरम्यान मंदिरात होळी आणि इतर सण साजरे करण्यासाठी पाकिस्तानी हिंदूंना पूर्ण सुरक्षा पुरवली पाहिजे. दियाल म्हणाले की, पाकिस्तानी हिंदूंना त्यांच्या उपासनेच्या संवैधानिक अधिकारापासून सतत वंचित ठेवले जात आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे.

हारून सरब दियाल यांनी अधिकाऱ्यांना दक्षिण पंजाबमधील स्थानिक हिंदू समुदायाच्या सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘जर आमची संपूर्ण सुरक्षेची मागणी पूर्ण झाली नाही, तर आम्हाला आमच्या संवैधानिक आणि नैतिक अधिकारांचा वापर करून उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यासपीठावर आवाज उठवावा लागेल.’ यावेळी, दियाल यांनी पाकिस्तानमधील हिंदू समुदायाला दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल तीव्र निराशा व्यक्त केली

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *