अमेरिकेच्या वस्तूंवर चीनचा अतिरिक्त कर

अमेरिकेतून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर चीनने शुक्रवारी अतिरिक्त ३४ टक्के कर लादला. तत्पूर्वी बुधवारी ट्रम्प यांनी ६० हून अधिक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली. त्यात चीनचा समावेश असून अमेरिकेच्या या शुल्काला चीनने जोरदार विरोध केला आहे. ट्रम्प यांनी आता चीनला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनने शुल्क लादून चुकीचे काम केले आहे. त्यांनी पोस्ट केले की, ‘माझी धोरणे कधीही बदलणार नाहीत. पूर्वीपेक्षाही श्रीमंत होण्याचा हा एक उत्तम काळ आहे.”

सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’च्या म्हणण्यानुसार, चीनचे अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क १० एप्रिलपासून लागू होतील. चीनने अमेरिकेच्या संरक्षण, संगणक आणि स्मार्टफोन उद्योगांना लक्ष्य करून काही दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याची योजना देखील जाहीर केली आहे. अमेरिकेच्या करवाढीबाबत चीनने जागतिक व्यापार संघटनेकडेही तक्रार दाखल केली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *