अमेरिकेच्या प्रमुख निर्देशकांना मोठे नुकसान

डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या परस्परकरांमुळे शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार ५ टक्क्यांहून अधिक घसरला.  ‘डाऊ जोन्स एसपी ५००’ आणि ‘नॅसडॅक’ निर्देशांकांची मोठी घसरण झाली. बँकिंग आणि बाजारतज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत ९ ट्रिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल कमी झाले आहे.

जागतिक आर्थिक मंदीची भीती गुंतवणूकदारांना वाटत असल्याने ‘डाऊ जोन्स’, ‘एस अँड पी ५००’ आणि ‘नॅस्डॅक’ सारख्या प्रमुख निर्देशांकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक ५.५० टक्क्यांहून अधिक घसरला.  ‘एस अँड पी ५००’ मध्ये जवळपास ६ टक्केंची घसरण झाली.  ‘नॅस्डॅक’मध्ये ५.७३ टक्के घसरण झाली.
शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार ५ टक्क्यांहून अधिक घसरल्याने अर्थातच याचा परिणाम जागतिक बाजारपेठांवरही झाला. ब्रिटन आणि जर्मनीच्या बाजारपेठांमध्येही घसरण झाली. भारतात ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ १ टक्क्यांहून अधिक घसरले.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *