
हजारो कोटी रुपयांच्या पीएनबी कर्ज घोटाळ्यात भारत ज्याचा शोध घेत होता, त्या फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारताने बेल्जियमकडे प्रत्यार्पणाबाबत विनंती केली होती. ती मान्य करून बेल्जियमने चोक्सीविरुद्ध ही कारवाई केली आहे. असोसिएटेड टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल बेल्जियममधील अँटवर्पमध्ये पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. त्याने तिथले ‘रेसिडेन्सी कार्ड’ सुद्धा मिळविले होते.चोक्सीची पत्नी प्रीती हिच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची विनंती केली. यानंतर तिथल्या प्रशासनाने चोक्सीला ताब्यात घेतले.
दरम्यान, बेल्जियममध्ये जाण्यापूर्वी चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडामध्येही राहत होता, असे समजले जाते. १३,५०० कोटी रुपयांच्या पीएनबी कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारत त्याचा शोध घेत आहे.