डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियमांचे कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम अमेरिकेबरोबरच जगातील अन्य देशांवरही होत आहे.  जगभरात सध्या याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकेच्या व्हिसा धोरणावर कडक भूमिका घेतली आहे.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नियमांचे कौतुक केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिकन कायदे आणि मूल्यांचा आदर करणाऱ्यांसाठी अमेरिकन व्हिसा हा एक विशेषाधिकार आहे. तथापि, हा अधिकार सर्व अर्जदारांना नाही.
त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना पाठिंबा दिला. रुबियो यांनी ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणांचे समर्थन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सत्तेत येताच त्यांनी मोठ्या संख्येने बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला, असे ते म्हणाले.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *