नवी दिल्लीत न्यायवैद्यक विज्ञान शिखर परिषद

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाद्वारे दोन दिवसीय अखिल भारतीय न्यायवैद्यक विज्ञान शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी भारत सरकारचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेची संकल्पना ‘नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये आणि दहशतवादाशी लढण्यात न्यायवैद्यक विज्ञानाची भूमिका’ अशी होती.

भारत सरकारचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठद्वारे विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित या अखिल भारतीय न्यायवैद्यक विज्ञान शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती राजेश बिंदल, आर. वेंकटरमण, भारताचे अ‍ॅटर्नी-जनरल न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *