नागपुरात स्कीन बँक उभारण्याचे निर्देश

उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झलेल्या स्फोटात जखमी कामगारांची मुख्यमंत्र्यांनी नागपूरमधील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णांच्या उपचाराची माहिती घेताना नागपूरमध्ये ‘स्कीन बँके’ची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळेस नागपूरमध्ये स्कीन बँक उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातूनही विविध घटनांमध्ये अतीगंभीर असलेल्या रुग्णांना त्वचेची आवश्यकता भासते. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधीक माहिती घेवून शासन स्तरावरील कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल, असे सांगितले.
ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले, त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली इथल्या बर्न हॉस्पीटलमध्ये हलविण्यात येईल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.