अरबी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका तैनात

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस कार्ल विन्सन’ अरबी समुद्रात तैनात करण्यात आली आहे. या भागात ‘यूएसएस ट्रुमन’ आधीच तैनात आहे. अर्थात, अमेरिकेने हे दुसरे विमानवाहू जहाज पश्चिम आशियात पाठविले आहे. इराणसोबतच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
ओमानची राजधानी मस्कत येथे इराणच्या अणुकार्यक्रमावर दोन्ही बाजूंमधील चर्चेचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी चर्चा सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्यामधील चर्चेची दुसरी फेरी रोममध्ये होऊ शकते.
दरम्यान, अरबी समुद्रातील या प्रदेशात, अमेरिकेचे सैन्य येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांना लक्ष्य करत आहे. अमेरिकेच्या या पावलाकडे इराणवर दबाव आणण्याची चाल म्हणून पाहिले जात आहे.  अमेरिका आणि इराणमध्ये दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी एक करार झाला. दि. १९ एप्रिल रोजी दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *