कान्स चित्रपट मलेत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा यात समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याचे शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. ‘स्नो फ्लॉवर’ या मराठी चित्रपटात मार्मिक कथा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *