चीनचे भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षण

अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणामुळे जागतिक पातळीवर व्यावसायिक वातावरण बदलले आहे. चीन भारतीय व्यावसायिकांना आकर्षित करण्यात गुंतला आहे. भारतीयांना त्यांच्या उत्पादनाविषयीच्या माहितीपासून दूर ठेवणारा चीन आता त्यांची यंत्रे विकण्यासाठी यंत्रसामग्रीची संपूर्ण माहिती भारतीय कंपन्यांच्या अभियंत्यांना देत ​​आहे. भारतीय अभियंते या प्रकारचे प्रशिक्षण सध्या घेत आहेत.
अलिकडेच, चीनमधील ‘शेन्झेन’ आणि ‘ग्वांगझू’ येथे झालेल्या व्यापार मेळ्यांमध्ये अनेक भारतीय कंपन्यांनी चिनी कंपन्यांसोबत करार केले आहेत.  भारतीय उद्योजक चिनी यंत्रे खरेदी करण्यास कचरत होते, कारण त्या बिघडल्यावर दुरुस्त करण्यात अडचणी येत होत्या.
अमेरिकेने सर्व चिनी उत्पादनांवर १४५ टक्के कर लादल्यानंतर, चीन भारताकडे आपल्या वस्तूंसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहे. त्यामुळे चीन भारतीय व्यावसायिकांना कच्च्या मालावर पूर्वीपेक्षा जास्त सवलती देत ​​आहे.
जेव्हा चिनी यंत्र बिघडल्यावर दुरुस्तीसाठी चिनी अभियंत्यांना भारतात बोलावावे लागले, परंतु चिनी अभियंत्यांना सहज व्हिसा मिळत नसल्याने, चिनी यंत्र दुरुस्त करण्यासाठी अनेकदा महिने लागले. उद्योजकांना तोटा सहन करावा लागला.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *