हल्लाग्रस्तांसाठी मुंबई महापालिका रुग्णालयांची सेवा

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई महापालिका रुग्णालयांनी पाऊल उचलले आहे. रुग्णालयाकडून मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज , बीवायएल नायर रुग्णालय, गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केइएम रुग्णालय, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल रुग्णालय तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि आर.एन. कूपर रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबईतील या चार प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, पीटीएसडीची शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती यासह सेवा दिल्या जाणार आहेत.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *