संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ९ मे रोजी रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर सोव्हिएत संघाच्या विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड आयोजित केली जाईल. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉस्कोमधील परेडसाठी आमंत्रित केले होते, परंतु भारताने रशियाला सिंह उपस्थित राहतील, असे कळविले आहे.
या संदर्भात एका सूत्राने सांगितले की, “पंतप्रधानांना मॉस्कोमधील या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मोदी गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत आणि काझानमधील ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोनदा रशियाला गेले होते. यावर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे.