विदर्भकन्या मिताली काबराचा राज्यात डंका

मुंबई | ६ मे २०२५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) १२वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून, विदर्भातील वाशिम जिल्ह्याची कन्या मिताली काबरा हिने ९९ टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये तिने शंभर पैकी शंभर गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. विदर्भात शिक्षणाची नवी पहाट मितालीच्या यशाने विदर्भातील ग्रामीण विद्यार्थिनींसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वाशिममधील शिक्षकांनी तिच्या या यशाला “विदर्भाच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक” म्हणून गौरवले आहे. एका ज्येष्ठ प्राध्यापकांचे मते –“साधनांची मर्यादा असूनही मितालीसारखी मुले जेव्हा राज्यपातळीवर यश मिळवतात, तेव्हा शिक्षणव्यवस्थेची समावेशकता अधोरेखित होते.”.
राज्याच्या निकालात कोकणचा झेंडा :
कोकण – 96.74% (सर्वोच्च)
कोल्हापूर – 93.64%
मुंबई – 92.93%
संभाजीनगर – 92.24%
एकूण राज्य निकाल – 91.88%
मुलींचा निकाल – 94.12%
मुले – 89.45%
संवेदनशील संघर्षाची दुसरी कहाणी – वैभवी देशमुख
बीड जिल्ह्यातील विद्यार्थिनी वैभवी देशमुख हिने पित्याच्या हत्या झाल्यानंतरही ८५.३३% गुण मिळवत संघर्षातून यश मिळवले. तिच्या धैर्याला वाचकांकडून सलाम दिला जात आहे.