बलूचिस्तानकडून पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा

बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या स्वतंत्रतावादी गटाने पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा केली आहे. BLA ने 9 मे 2025 रोजी बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली असून, “डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान” या नावाने स्वतंत्र राष्ट्राची स्थापना केली आहे. या घोषणेनंतर, BLA ने पाकिस्तानच्या सैन्यविरोधात 51 ठिकाणी 71 हल्ले केल्याचा दावा केला आहे.

BLA ने पाकिस्तानला “आंतरराष्ट्रीय दहशतवादी राष्ट्र” म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाकडे बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आवाहन केले आहे. BLA च्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “जर भारताने पाकिस्तानला नष्ट करण्याचा अंतिम निर्णय घेतला, तर BLA आणि संपूर्ण बलूच राष्ट्र पश्चिम सीमेवरून हल्ला करण्यास तयार आहे.” BLA ने 10-11 मे 2025 दरम्यान बलूचिस्तानमधील 39 ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्य तळांवर, पोलिस ठाण्यांवर आणि इतर सरकारी इमारतींवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये त्यांनी पाकिस्तानचे झेंडे उतरवून बलूचिस्तानचे झेंडे फडकावले आहेत.

BLA ने भारताशी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलले, तर आम्ही त्याचे सैन्यदल म्हणून कार्य करण्यास तयार आहोत.” त्यांनी भारताकडे बलूचिस्तानमध्ये दूतावास उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय समुदायात चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कोणत्याही देशाने बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला औपचारिक मान्यता दिलेली नाही, परंतु भारत आणि युरोपियन देशांमध्ये या विषयावर चर्चा सुरू आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *