इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार

मुंबई 13 मे 2025 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 10वी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाचा एकूण निकाल 93.45% लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालात किंचित वाढ झाली आहे. यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली असून त्यांचा यशाचा टक्का 95.23% तर मुलांचा टक्का 91.67% इतका आहे. एकूण उत्तीर्णता टक्का: 93.45%, मुलींचा यशाचा टक्का: 95.23%, मुलांचा यशाचा टक्का: 91.67%, कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल – 98.12% .
विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार :
🔹 www.mahresult.nic.in
🔹 www.sscresult.mkcl.org
🔹 www.maharashtraeducation.com
शाळांना विद्यार्थ्यांची गुणपत्रके 2 दिवसांत वितरित करण्यात येणार असून, डिजिटल लॉकर व digilocker.gov.in वरूनही गुणपत्रक मिळवता येईल. ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. पुनर्परीक्षेसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज लवकरच खुला होणार आहे. याविषयी संपूर्ण माहिती मंडळाच्या वेबसाइटवर दिली जाईल.