मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई 13 मे 2025 रोजी भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरात येत्या 24 ते 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. प्री-मान्सून पावसाच्या आगमनामुळे या भागांत विजांसह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याचाही धोका आहे.
मुंबई महापालिकेने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून, निचऱ्याच्या ठिकाणी विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीमधील मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. घराबाहेर पडताना हवामानाची माहिती घ्या, विजांच्या गडगडाटात बाहेर राहू नका, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरावी, पावसाचे हे सुरुवातीचे आगमन असून पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहू शकते, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.