पाकिस्तान, चीन आणि तुर्कीनंतर आता फिलीपिन्समध्येही तीव्र भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. युरोपियन-भूमध्य भूगर्भीय केंद्राच्या मते, फिलीपिन्समधील काबांकलन शहरापासून ७८ किलोमीटर पश्चिमेला एक तीव्र भूकंप झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:३३ वाजता हा भूकंप जाणवला, त्याचे केंद्र सुलू समुद्रात होते. भूकंपाचा केंद्रबिंदू सिपले शहराच्या वायव्येस 37 किलोमीटर अंतरावर होता.
त्याआधी गुरुवारी १५ मे दुपारी ३.४६ वाजता तुर्कीला ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. कुल्लूच्या ईशान्येकडील १४ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थे मेहरने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के तुर्कीची राजधानी अंकारामध्येही जाणवले, परंतु कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. काल म्हणजेच शुक्रवारी १६ मे चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार ६:२९ वाजता चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली सुमारे १० किलोमीटर खाली होती.