मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात सचित्र भित्तीपत्रक प्रदर्शन

19May, 2025
महिला व बालविकास विभागाच्यावतीने सचित्र भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र दर्शन’ या विशेष उपक्रमांतर्गत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सचित्र भित्तीपत्रकांचे आज १९ ते २१ मे या कालावधीत हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र दर्शन’ या प्रदर्शनाद्वारे विविध प्रकारची सचित्र भित्तीपत्रके मांडण्यात येतील. त्याद्वारे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे. मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.