पाकिस्तानला दिलेले पैसे वाया जाऊ शकतात, अशी भीती जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आहे. म्हणून या संस्थेने मोठे पाऊल उचलले आहे. नाणेनिधीने पाकिस्तानसाठी त्यांच्या मदत कार्यक्रमाचा पुढील हप्ता जाहीर करण्यापूर्वी ११ नवीन अटी लादल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळाले होते. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला पैसे देण्याबाबत नाणेनिधीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.
नाणेनिधीने भारत-पाकिस्तान तणावाचे वर्णन ‘आर्थिक कार्यक्रमासाठी गंभीर धोका’ असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानवर लादलेल्या अटीत पुढील आर्थिक वर्षासाठी संसदेतून १७,६०० अब्ज रुपयांचे नवीन बजेट मंजूर करणे अनिवार्य असेल.वीज बिल वाढवावे लागेल.तीन वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठवावी लागेल, आदींचा समावेश आहे.