जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेत वाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ब्राझील दौऱ्यावर आहेत. त्यांनी ब्राझीलमधील साओ पावलो येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी विशेषतः जैवइंधन, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारतात गुंतवणुकीसाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतीय समुदाय नवोपक्रम, कृषी-व्यवसाय, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्याद्वारे भारत-ब्राझील संबंधांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. भारत संधींची भूमी असल्याचे सांगून गडकरी यांनी भारतीय नागरिकांना शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडविण्याकरिता शोध, गुंतवणूक आणि भागीदारी करण्यासाठी आमंत्रण दिले. भारतीय समुदायाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे त्यांनी समर्पक निरसन केले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *