परदेशातील भारतीयांसाठी नवे पोर्टल

भारताच्या परदेशातील नागरिकांसाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. नवीन पोर्टल सुरू करताना अमित शाह म्हणाले की, “भारतीय वंशाचे नागरिक जगातील अनेक देशांमध्ये राहतात. भारतात येताना आणि येथे राहताना त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची खात्री करणे महत्वाचे आहे. नवीन पोर्टल या दिशेने काम करेल.”

ओसीआय कार्डधारकांच्या अभिप्रायाच्या आधारे हे नवीन पोर्टल करण्यात आले असून जुने कार्डधारक तसेच नवीन ओसीआय कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांकरिता सोयीस्कर बनविण्यात आले आहे. जुने ओसीआय पोर्टल हे सन २०१३ मध्ये विकसित करण्यात आले होते.

नवीन पोर्टलमध्ये वापरकर्ता साइनअप आणि नोंदणी मेनू वेगळे केले आहेत. यासाठी, नोंदणी फॉर्ममध्ये वापरकर्त्याची माहिती स्वयंचलितपणे भरली जाईल. पूर्ण आणि अंशतः भरलेला अर्ज दर्शविण्यासाठी एक विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *