खासगी आस्थापनांना शी बॉक्स पोर्टलवर नोंदणीचे आवाहन

केंद्र सरकारने सर्व खासगी आस्थापनांना ‘शी बॉक्स’ पोर्टलवर अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीची नोंदणी ‘शी बॉक्स’ या पोर्टलवर ३१ मे पर्यंत करणे करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर आणि जिल्हा नोडल अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.
नोंदणीसाठी आस्थापनांनी https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन, ‘प्रायव्हेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन’ या टॅबवर क्लिक करून आवश्यक माहिती भरून सबमिट करावे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी ही प्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नियमांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.