सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • उद्योग/
  • कापूस प्रकिया उद्योग

कापूस प्रकिया उद्योग

by सह्याद्री मराठी वृत्त 24 March 2023 0 Comments
24Mar, 2023

शुन्यातून आकार घेणारे छोटे व्यवसाय कधी मोठ्या उद्योगाचे रूप धारण करतील, सांगता येत नाही. महाराष्ट्रातील विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा कापूस शेतकरी विकतात. या कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आपल्याकडे हवेत तेवढे उपलब्ध नाहीत; परंतु अलिकडे कापसाच्या वाती, वस्त्रे, गळ्यातील हार तसेच अन्य आकर्षक वस्तू बनवून त्या विकण्याकडे कल वाढलेला आहे.

असा कापूस प्रक्रिया उद्योग आपण सुरु करु शकता. हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात देवपुजेला कापसाच्या वाती, वस्त्र आवश्यक असतात. पूर्वी घरातील जाणत्या स्त्रिया फावल्या वेळेत या वस्तू घरी बनवीत. आता स्त्री अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागल्याने या वस्तू बनविणे कठीण झाले. त्यामुळे त्या विकत घेण्याकडेच कल वाढला. त्यामुळे या प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे.

आपण कापसाच्या वाती वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बनवू शकता. छोटे निरंजन, मोठे निरंजन, समई अशा विविध प्रकारच्या वाती आपण बनवू शकता. या वातींचा पीळ मात्र सारखा असायला हवा. आपण फुलवाती बनवू शकता. वाती लहान व मोठ्या अशा आकाराच्या बनवाव्यात. नंतर या वातींना आकर्षकपणे वेष्टनबंद करून विक्रीस ठेवावे.

अशाच पध्दतीने फुलवाती व तुपातील वाती बनवू शकता. तुपातील वातींसाठी आपणांस प्रशिक्षण घ्यावे लागेल. या वातींसाठी बाजारात यंत्रे मिळतात. ही यंत्रे विकत घेऊन आपण आपला उद्योग वाढवू शकता. अनेकजण हा व्यवसाय करतात. स्थानिक दुकाने, धार्मिक ठिकाणे येथे विक्रीस ठेवतात.

या उद्योगासाठी फार मोठी जागा असण्याची आवश्यकता नाही. फुलवातीचे यंत्र लहान असते. कच्चा माल कुठून स्वस्तात मिळेल हे पहावे. आपले उत्पादन आकर्षक पद्धतीने वेष्टनबंद करावे. समाजमाध्यमांचा अशा वेळी उत्तम वापर करून घ्यावा. आपल्या उत्पादनाची तेथे जाहिरात करावी. वेगवेगळ्या तऱ्हेचे गळ्यातील हार, आकर्षक वस्तू बनवून तेसुद्धा याच्या जोडीने विकू शकता. ‘यु ट्यूब’वरील ‘व्हिडीओज’चा यासाठी वापर करून घ्या. या उद्योगातून अनेकजणांनी आपली आर्थिक समृद्धी साध्य केली आहे.

Next
रायगडमधील श्री हरिहरेश्वर
March 24, 2023
Previous
तळलेली भरली मिरची
March 23, 2023
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to कापूस प्रकिया उद्योग?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !