जपानी महिलांचे सौंदर्यप्रसाधन

जपानी महिलेच्या चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा डाग क्वचितच दिसतात. याचा अर्थ असा अजिबात नाही, की जपानी महिलांना मुरुमांसारख्या समस्या नसतात! पण अशा त्वचेसाठी त्या विशेष काळजी घेतात. जपानी महिला करीत असणारा हा उपाय केलात तर तुमच्या त्वचेवरून सर्व डाग नाहीसे होतील. जपानी महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी करतात.

जपानी महिला पांढरा तांदूळ वापरतात. पांढरा तांदूळ जपानी महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांचा एक भाग आहे. तो त्वचेला झटपट चमक आणण्यास मदत करतो  .

तांदळापासून जर ‘क्रीम’ बनवायची असेल तर अशा पद्धतीने करा. कोणत्याही भांड्यात २ चमचे पांढरे तांदूळ काढा. आता त्यात १ कप पाणी घाला.  भात मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.

तांदूळ पूर्ण शिजल्यावर आणि जाडसर वाटणासारखे दिसू लागल्यावर गॅस बंद करून भांडे उतरवा.
आता त्यात १ ते २ चमचे गुलाबजल टाका आणि चमच्याने  फेटून बारीक मिश्रण करा.
हे शिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यास चांगले होईल. आता हे क्रीम दुसऱ्या भांड्यात चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. घट्ट असल्याने गाळायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे गाळताना गाळणीचा वापर करा. आता या क्रीममध्ये दोन चमचे दूध घालून चांगले मिसळा. दूध चांगले मिसळून झाल्यावर त्यात १ चमचा बदाम तेल मिसळा. नीट मिसळून घेतल्यानंतर त्यात १ लहान चमचा खोबरेल तेल टाका.

हे राईस क्रीम त्वचा सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहे.  हवे असल्यास गुलाबपाणीऐवजी साधे पाणीही वापरू शकता. पण या क्रीमचा प्रभाव वाढविण्यासाठी गुलाबजल जास्त उपयुक्त आहे. यामुळे  त्वचेला जपानी महिलांप्रमाणे गोरी आणि तेजस्वी चमक मिळण्यास मदत होईल.

तांदूळ त्वचेचे वृद्धत्वापासून संरक्षण करते. म्हणजेच म्हातारपण  चार हात लांबच राहते. चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक रेषा, सुरकुत्या यासारख्या समस्या दूर राहतात. ही क्रीम कोणत्याही वयोगटातील व्यक्ती लावू शकते, पण वैद्यकीय सल्ल्यानेच याचा उपयोग करावा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *