
सध्याचे दिवस कैरीचेच आहेत, नाही का? पाहताक्षणी जिभेला पाणी सुटणारी कडक कैरी कुणाला नाही आवडत? चला तर मग, आज बनवूया कैरीची चटणी!
साहित्य – अर्धी वाटी कमी आंबट कैरीचा कीस, या किसाएवढेच सुके खोबरे, 3 चमचे गूळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि आवडत असल्यास फोडणी.

कृती – एका भांड्यात मीठ, तिखट, जिरे, कैरीचा आणि खोबऱ्याचा कीस, गुळ, आवडत असल्यास कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून चटणीसारखे वाटून घ्यावे. चटणी तयार आहे. पण आपणास फोडणी आवडत असल्यास एका कढईत दोन चमचे तेल घ्यावे. चांगले गरम झाले की मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. फोडणी थोडी थंड झाल्यावर चटणीवर घालून अलगद मिसळून घ्यावी. तोंडी लावण्याचा एक छानसा पदार्थ!